वृत्तसंस्था / मुंबई
व्होल्टास कंपनीचे समभाग मंगळवारी शेअरबाजारात 2 टक्के वधारलेले पाहायला मिळाले. कंपनीच्या समभागाचा भाव मंगळवारी वाढीसह 905 रुपयांवर पोहचला होता. याआधी बीएसईवर समभाग 887 रुपयांवर बंद झाला होता. वर्षभरात हा लार्ज कॅप गटातला समभाग 28 टक्के घसरला असला तरी 2023 मध्ये मात्र 12 टक्के वधारला आहे. गेल्या तीन सत्रात कंपनीचा समभाग घसरणीत राहिला होता. जेफरीज या ब्रोकरेज फर्मने हा समभाग 1050 रुपयांवर पोहचू शकतो, असा अंदाज व्यक्त केलाय.









