चेन्नई :
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी फोक्सवॅगनची नवी टायगुन आर लाइन कार भारतात लाँच करण्यात आली आहे. सदरच्या गाडीची किंमत 48 लाख रुपये एक्सशोरुम असणार आहे. एसयुव्ही गटातील ही कार असून हिला 2 लिटर टर्बोचार्जड पेट्रोल इंजिन आहे. अंतर्गत रचना काळ्या रंगावर आधारीत असून लाल रंगाच्या अॅक्सेंटचा वापरही केला गेलाय. याने या गाडीला स्पोर्टी लुक आला आहे. 12.9 इंचाची इन्फोटेन्मेंट टचस्क्रिन तर यात आहेच शिवाय 10.3 इंचाचा फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही याला देण्यात आलाय. वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॉमिक सनरुफ, 6 एअरबॅग्ज दिल्या आहेत.









