वृत्तसंस्था / मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ न्यूझीलंड बरोबर वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका न्यूझीलंडमध्ये डिसेंबरच्या उत्तरार्धात होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन महिला संघाची घोषणा करण्यात आली असून सलामीची फलंदाज जॉर्जीया व्हॉलचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना 19 डिसेंबरला, दुसरा सामना 21 आणि तिसरा सामना 23 डिसेंबरला होणार आहे. हे सर्व सामने वेलिंग्टनच्या बेसीन रिझर्व मैदानावर खेळविले जातील. या मालिकेसाठी अॅलिसा हिलीकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ: अॅलिसा हिली (कर्णधार), मॅकग्रा, ब्राऊन, गार्डनर, गॅरेथ, किंग, लिचफिल्ड, मॉलिन्युक्स, बेथ मुनी, इलेसी पेरी, मेगान शुट, सुदरलँड, जॉर्जीया व्हॉल आणि वेअर हॅम









