मुंबई :
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी वोडाफोन आयडियाचे समभाग सोमवारी 10 टक्के इतके वाढताना दिसून आले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात सकारात्मक वक्तव्य केल्याचा परिणाम समभागावरती दिसून आला. वोडाफोनची शिल्लक असलेली बाकी रक्कम व एकंदर त्या संदर्भातल्या निर्णयाबाबत सरकारने जबाबदारी घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या स्पष्टतेनंतर गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी करण्यासाठी धडपड केली. शेअर बाजारात इंट्राडे दरम्यान समभाग 9.9 टक्के वाढत 9.6 रुपयांवर पोहोचला होता.









