वृत्तसंस्था/ मुंबई
व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये 26 सप्टेंबर रोजी 6 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. खरं तर, सर्वोच्च न्यायालयाने कंपनीच्या एजीआर प्रकरणाची सुनावणी 6 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. या बातमीनंतर, या कंपनीचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
कंपनीचा समभाग सध्या 8.15 रुपयांवर व्यवहार करत आहे, सुमारे 6 टक्केनी घसरणीत राहिला आहे. कंपनीचा समभाग एका महिन्यात 23 टक्के आणि 6 महिन्यांत 17 टक्के वाढला आहे. वर्षात कंपनीचा समभाग 20 टक्क्यांनी घसरला. कंपनीचे एकंदर सध्याचे बाजारमूल्य 89.17 हजार कोटी रुपयांचे असल्याचे समजते.
सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेने तोडगा काढावा
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारकडे आता व्होडाफोन आयडियामध्ये 48.99 टक्के हिस्सा असल्याने, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारा उपाय शोधणे आवश्यक आहे. तुषार मेहता यांनी न्यायालयाला 26 सप्टेंबर रोजी पुनर्सुनावणीसाठी प्रकरण सूचीबद्ध करण्याची विनंती केली. मेहता म्हणाले, ‘आम्ही व्होडाफोन आयडियाच्या याचिकेला विरोध करत नाही आहोत. सरकार देखील कंपनीमध्ये भागधारक आहे, त्यामुळे कोणताही उपाय सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने घ्यावा.’









