वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कर्जाच्या ओझ्याखाली प्रवास करत असणारी कंपनी व्होडाफोन-आयडियाने आपले तिमाही निकाल नुकतेच सादर केले आहेत. यामध्ये कंपनीने सांगितले की, जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित तोटा हा 7,175.9 कोटी रुपयांपर्यंत कमी झाल्याची माहिती दिली आहे. तसेच व्हीआयने सांगितले की, मागील आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत 8,746.6 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच महसुल 1.8 टक्क्यांनी वाढून 10,918.1 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा 10,714.6 कोटी रुपये होता. दरम्यान जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल वाढून तो 10,932.2 कोटी रुपये झाला आहे.









