200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह होणार सादर
मुंबई :
200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला विवो व्ही60 इ हा 5-जी फोन 7 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच होणार आहे. स्पेसिफिकेशन्स देखील उघड झाले. काही दिवसांपूर्वी, 91 मोबाइल्सने आगामी विवो व्ही 60इ या स्मार्टफोनचा फर्स्ट लूक शेअर करणारा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट प्रकाशित केला होता, ज्यामध्ये त्याचे स्वरूप आणि डिझाइन तपशीलवार सांगितले होते.
यानंतर मंगळवारी, फोनची लाँचिंग तारीख सादर झाली आहे. विवो व्ही 60इ हा येत्या 7 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच होणार असल्याची माहिती ऑनलाइन समोर आली आहे. भारतीय बाजारात विक्री होणारा हा या मालिकेतील दुसरा स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये स्टायलिश लूकसह इतर वैशिष्ठ्यो आहेत. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 28,999 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच होईल. त्याचप्रमाणे, 8 जीबी प्लस 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 30,999 आहे.









