50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह इतर अनेक सुविधांचा समावेश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चीनमधील स्मार्टफोन कंपनी विवो यांनी आपला विवो व्ही 29 आणि विवो व्ही 29 प्रो हे दोन स्मार्टफोन्स भारतामध्ये लॉन्च केले आहेत. हिमालयन ब्ल्यू आणि स्पेस ब्लॅक या दोन रंगांमध्ये विवो व्ही 29 प्रो हा स्मार्टफोन येणार असून हिमालयन ब्ल्यू, स्पेस ब्लॅक आणि मॅजेस्टिक रेड या तीन रंगांमध्ये व्ही 29 हा स्मार्टफोन येणार आहे. यापैकी विवो व्ही 29 हा फोन 17 ऑक्टोबरपासून तर प्रो 10 ऑक्टोबरपासून खरेदीकरता उपलब्ध केला जाणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जसे की फ्लिपकार्टवर आणि विवो इंडिया इ-स्टोरवर विक्री करता उपलब्ध केला जाणार आहे. विवो व्ही 29 8जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह येणार असून याची किंमत 32 हजार 999 रुपये असणार आहे. व्ही 29 प्रो स्मार्टफोन 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह येणार असून सुमारे 40 हजार रुपये इतकी याची किंमत असणार आहे. बँक कार्डच्या माध्यमातून सुरुवातीला स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना 3500 पर्यंत सवलत मिळणार आहे.
नव्या फोन्सची वैशिष्ट्यो
- 6.78 इंचाचा डिस्प्ले
- व्ही 29 ला कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778 जी प्रोसेसर
- दोन्ही स्मार्टफोनकरिता अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टीम
- 50 मेगापिक्सल पिक्सलचा कॅमेरा









