अंदाजे 12,000 किंमत : 6500 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार
मुंबई :
चिनी टेक कंपनी विवो आज भारतीय बाजारात आपला टी4एक्स हा स्मार्टफोन 5 जी मध्ये सादर करणार आहे. कंपनीने दावा केला आहे. 44 डब्लू चार्जिंग सपोर्टसह शक्तीशाली बॅटरी 6500 एमएएच क्षमतेची मिळणार आहे. याशिवाय मीडिया टेक डायमेन्शन 7300 चिपसेट मिळणार आहे. अँड्राईड 15 वर आधारीत असणारा हा फनटच ओएसवर चालण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज तीन कॉम्बिनेशन राहणार आहे. अंदाजे या स्मार्टफोनची किंमत ही 12,000 रुपये इतकी राहणार असल्याचा अंदाजही लावला जात आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लाँचिंगची घोषणा केली आहे. या संदर्भातील अधिकचे स्पेसिफिकेशन शेअर केले आहेत.









