50 एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह एमडी 9200 प्रोसेसर शक्य
वृत्तसंस्था/ मुंबई
चीनी टेक कंपनी विवो कंपनीचा ‘विवो टी3 अल्ट्रा’ स्मार्टफोन 12 सप्टेंबर रोजी लाँच होणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात कंपनीने ई कॉमर्स वेबसाइट व फ्लिपकार्टसह अन्य अधिकृत वेबसाइटवर फोनचा टिझर सादर केला आहे. यावेळी सादरीकरणाबद्दलची तारीख जाहीर केली आहे.
यावेळी कंपनीने दावा केला आहे की, आगामी स्मार्टफोन मीडीयाटेक डायमेशन 9200 प्लस चिपसेटने सुसज्जीत राहणार आहे. तसेच अँड्रॉईड स्कोअर 1600 के आहे. ज्यामुळे सदरचा फोन हा सर्वात वेगवान फोन बनणार असल्याचे म्हटले आहे. विवो टी3 अल्ट्रामध्ये 50 एमपी सेल्फी कॅमेरा देखील राहणार आहे. स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच वक्र अमोलेड डिस्प्ले राहणार असून प्राप्त अहवालानुसार हा फोन 80 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500 एमएएच बॅटरी येणार असल्याची शक्यता अधिक आहे.