प्रतिनिधी /निपाणी
नेसातर्फे स्पुतनिक वेल्थ निपाणी – रासाई हिल मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या स्पर्धेला राज्यातून आणि राज्या बाहेरून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत 25 किलोमीटरमध्ये पुऊषांच्या खुल्या गटातून चंदगडच्या विवेक मोरेने एक तास 23 मिनिटे 58 सेकंदात अंतर कापताना मॅरेथॉन स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले. जोल्ले ग्रुपतर्फे विजेत्यांना रोख बक्षीस, चषक, प्रमाणपत्र देऊन मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, स्पुतनिक वेल्थचे सुनील वडगावे यांच्यासह मान्यवर व नेसा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
रविवारी पहाटे चार वाजल्यापासून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी मुनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर हजेरी लावली. सकाळी सव्वा सहा वाजता मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत 25, 10 आणि 5 किलोमीटर अशा अंतराच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सुमारे 1800 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
पुऊषांच्या 25 किलोमीटर अंतराच्या खुल्या गटात इसाक कामेरी या केनियाच्या स्पर्धकाने द्वितीय तर प्रथमेश परमकर याने तृतीय क्रमांक पटकावला. महिलांच्या खुल्या गटात जस्मिता कोडणकेरी यांनी 2 तास 18 मिनिटे 2 सेकंदात अंतर कापताना प्रथम क्रमांक पटकावला. मानसी लोखंडे-केनवड व मिनाज सलीम नदाफ यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला
दहा किलोमीटर अंतराच्या पुऊष गटात मोनू कुमार, प्रधान कुऊलकर, अमित पाटील महिला गटात रोहिणी पाटील, प्रतिभा नाडकर, प्रविना गिरी यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. पाच किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉनमध्ये निपाणी शहर व परिसरातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवला होता.
यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजीव गुंदेशा, नेसाचे डॉ. संदीप चिखले, डॉ. सुहास पाटील, अतिश खोत, डॉ. माधव कुलकर्णी, दीपक मेंडगुदले, साईराम अकोळे, सचिन कुलकर्णी, राजेश घटे, अभ्यूदय घटे, सनत जमदाडे, संजय हालभावी, डॉ. शिवानंद दुमाले, योगेश पुराणिक, अश्विन पाटील, डॉ. प्रमोद निळेकर, गजानन गुरके, जयदीप गुरव, देव टिंगरे, डॉ. अर्जुन जनवाडे, तुषार माळी, संदीप खोडबोळे, साहिल शाह, अमर संकपाळ, विनोद साबळे यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते. गायत्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









