2018 मध्ये न्यायाधीशाविरोधात टिप्पणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. न्यायपालिकेचा मी आदर करत असल्याचे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी अग्निहोत्रींना सोमवारी सुनावणीसाठी हजर रहावे लागले आहे. सध्या ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेल्या एस. मुरलीधर यांच्या विरोधात केलेल्या ट्विटसप्रकरणी माफी मागण्याचा आदेश अग्निहोत्रींना देण्यात आला होता.
दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना एस. मुरलीधर यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केला होता. याच्या विरोधात विवेक यांनी काही ट्विट्स केले होते. परंतु न्यायालयाच्या अवमानाचा आरोप झाल्यावर त्यांनी काही ट्विट्स हटविले होते. यानंतर देखील न्यायालयाने त्यांना 16 मार्च 2023 रोजी हजर राहण्याचा आदेश दिला होता. 16 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत अग्निहोत्री उपस्थित राहिले नव्हते. तेव्हा न्यायालयाने करत पश्चाताप एखाद्या प्रतिज्ञापत्राद्वारे व्यक्त करत नसल्याचे म्हणत 10 एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश दिला होता.









