बेळगाव : खानापूर येथील सीटीएम स्पोर्ट्स क्लब आयोजित आम. विठ्ठल हलगेकर चषक सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एसके ब्रदर्स संघाने तनय स्पोर्टिंग गोवा संघाचा 2-1 एक अशा गोलफरकाने पराभव करून विठ्ठल हलगेकर चषक पटकाविला. अभिषेक चेरेकरला उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले. खानापूर येथे आयोजित या फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात एस के ब्रदर्सने खानापूर संघाचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात कौशिक पाटीलने एकमेव गोल केला. दुसऱ्या सामन्यात एस के ब्रदर्सने महाकाल खानापूर संघाचा 3-2 असा पराभव केला. एस के. ब्रदर्सतर्फे कौशिक पाटील, अभिषेक चेरेकर व अमृत यांनी गोल केले. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात एस के ब्रदर्सने गोवा संघाचा 4-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अभिषेक चेरेकर, कौशिक पाटील व अमृत यांनी गोल केले. उपांत्य सामन्यात एस के ब्रदर्सने फास्ट फॉरवर्डचा 1-0 असा पराभव केला. अभिषेक चेरेकरने एकमेव गोल गेला. अंतिम सामन्यात एस के ब्रदर्सने बलाढ्या तनय स्पोर्ट्स गोवा संघाचा 2-1 कसा पराभव करून विजेतेपद मिळविले. या सामन्यात अमृतने 2 गोल केले. तर गोवातर्फे फ्रान्सिसने एक गोल केला. सामन्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एस के ब्रदसं संघाला रोख 50 हजार रुपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या तनय स्पोर्ट्स गोवा संघाला 21 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू एस के ब्रदर्सच्या अभिषेक चेरेकरला चषक देऊन गौरविण्यात आले. एस के ब्रदर्स संघात कौशिक पाटील, यश सुतार, शशांक बुळगुंडी, तुषार रेवणकर, अमृत, वैभव नेसरीकर, अभिषेक चेरेकर, निखिल नूब आदी खेळाडूंचा समावेश आहे.









