ओटवणे । प्रतिनिधी
मुळचे देवसु येथील आणि सध्या मुंबईस्थित विठू भिवा माळी (६५) त्यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत लॉजिस्टिक कंपनीत ते कामाला होते. देवसू ग्रामस्थ मंडळ (मुंबई) ते सक्रिय कार्यकर्ते होते. माजी सैनिक तानाजी माळी यांचे ते चुलत भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, बहिण, चुलत भाऊ, भावजय, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.









