दुबई/ वृत्तसंस्था
येथे सुरू असलेल्या ग्लोबल लीग बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसने भारतीय ग्रँडमास्टर तसेच दोन वेळेला विश्व बुद्धिबळ विजेत्या विश्वनाथन आनंदला पराभवाचा धक्का दिला. 2021 साली दुबईमध्ये विश्व विजेतेपद मिळविणाऱ्या इयान नेपोमिनियाचीला कार्लसनने अन्य एका डावात बरोबरीत राखले.
या स्पर्धेत शुक्रवारी विविध पटावर चार डाव खेळविण्यात आले. या स्पर्धेत आनंदच्या सहकारी ग्रँडमास्टर्सने 21 गुणांसह गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले होते. या सांघिक स्पर्धेत आनंदच्या पराभवानंतर गँजेस ग्रँडमास्टर्सनी एसजी अल्पेनी वॉरियर्सवर सर्वंकष 11-6 अशा गुणांनी विजयी नोंदविला. आता या स्पर्धेत रविवारी 4 डाव खेळविले जाणार आहेत. जीसीएल त्रिवेणी काँटिनंटल किंग्ज तसेच बालन नाईटस् यांच्याबरोबर प्रत्येकी दोन डाव खेळणार आहे.









