व्यवस्थापन, उत्पादन, वाहतुकीविषयी घेतली माहिती
बेळगाव : केएलएस जीआयटी एमबीए कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकताच गुजरात येथे अभ्यासदौरा केला. 49 विद्यार्थ्यांनी या अभ्यासदौऱ्यामध्ये कंपन्यांना भेटी देऊन तेथील प्रत्यक्ष औद्योगिक उत्पादनांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथील निरमा युनिव्हर्सिटी, अमूल फॅक्टरी, राजकोट येथील बालाजी वेफर्स, अदानी पोर्ट, अदानी सोलार, अदानी विल्मर, अदानी पॉवर, मुंद्रा येथील अदानी वेस्टपोर्ट या ठिकाणी भेटी दिल्या. डेअरी उत्पादने, सहकाराचे व्यवस्थापन व नवीन तंत्रज्ञान याविषयीची माहिती अमूल उद्योगाला भेट दिल्यानंतर घेण्यात आली. बालाजी वेफर्सचे व्यवस्थापकीय संचालक चंदूभाई विरानी यांनी उद्योगाची संपूर्ण माहिती दिली. उत्पादन मालापासून ग्राहकांपर्यंत माल पोहोचविण्यामध्ये कशा पद्धतीने मॅनेजमेंट, पॅकेजिंग, स्टोरेज, मार्केटिंग व ट्रान्स्पोर्टेशन यामध्ये काम होते, याची माहिती अदानी उद्योग समूहाला भेट दिल्यानंतर मिळाली. यावेळी कॉलेजचे प्राध्यापक तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.









