पुणे / प्रतिनिधी :
‘सहकार भारती’चे राष्ट्रीय सरचिटणीस उदय जोशी यांनी ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी’च्या पुणे येथील प्रधान कार्यालयास भेट दिली.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते या वेळी जोशी यांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोसायटीचे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, समन्वयक भालचंद्र कुंटे, कॉर्पोरेट कार्यालयाचे समन्वयक विनायक जाधव, ‘सहकार सुगंध’ मासिकाचे भालचंद्र कुलकर्णी आदी मान्यवर, विविध पदाधिकारी, कर्मचारी, सभासद हितचिंतक उपस्थित होते. जोशी यांनी सोसायटीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत वित्तीय सहकार क्षेत्रात ‘लोकमान्य सोसायटी’ने केलेली कामगिरी गौरवास्पद असल्याचे कौतुकोद्गार या वेळी काढले.