कंग्राळी बुद्रुक /वार्ताहर
श्री कलमेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी डेप्युटी रजिस्ट्रार एम. एन. मनी यांनी नुकतीच भेट देवून सोसायटीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
संस्थेचे सेक्रेटरी अनिल कडोलकर यांनी प्रास्ताविकमध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष हुद्दार, संचालक विजय पावशे, मल्लाप्पा तळवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी सेल ऑफीसर शंकर यांचे सेक्रेटरी अनिल कडोलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कर्मचारी गजानन पावशे, जोतिबा जाधव, जोतिबा मोटणकर, मनोहर पाटील, अनन्या पावले, प्रांजल किल्लेकर, बाळू पाटील, नारायण पाटील, मारुती पाटील उपस्थित होते. प्रांजल किल्लेकर यांनी आभार मानले.









