समस्या जाणून विकासकामांचा केला शुभारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव उत्तरचे आमदार राजू ऊर्फ असीफ सेठ यांनी शुक्रवारी जनता दरबार आयोजित केला होता. ग्रामीण भागातील बसवन कुडची, यमनापूर या भागाला त्यांनी भेट दिली. या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी ऐकून रस्ते जोडणी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आरोग्य सुविधा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
आमदार सेठ यांनी समस्या जाणून घेत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. तसेच बसवन कुडची व यमनापूर येथे अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. बसवन कुडची व यमनापूर येथील मंदिरे व मशिदी यांना भेटी देऊन त्यांच्या सुधारणांविषयी माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर दुपारी किल्ला तलाव परिसरातील विकासकामांना आमदार राजू सेठ यांच्या हस्ते गती देण्यात आली.









