मिरवणूक मार्गाची केली पाहणी : स्थानिक परिस्थितीची घेतली माहिती
बेळगाव : गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी अनगोळ येथील संवेदनशील भागाची पाहणी केली. यावेळी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली. शनिवारी टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मिरवणूक मार्गाची पोलीस उपायुक्तांनी पाहणी केली. यावेळी खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणसी आदी अधिकाऱ्यांनी त्यांना स्थानिक मिरवणूक मार्गाची माहिती दिली. पोलीस उपायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रोहन जगदीश यांनी बेळगाव येथील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांना भेटी देऊन बेळगावसंबंधी भौगोलिक व स्थानिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.









