प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट लोकल बोर्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्कूलचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला भेट दिली. प्राचार्यांनी शैक्षणिक व प्रशासकीय विकासांबाबत व भविष्यात करण्यात येणाऱया योजनांबद्दल माहिती दिली.
यावेळी नूतनीकरण केलेल्या स्क्वॅश कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अधिकाऱयांनी शाळेला फेरफटका मारून शैक्षणिक वर्ग, आर्ट गॅलरी व छात्र वसतीगृहांना भेट दिली. प्रताप हाऊसमध्ये केलेल्या नूतनीकरणाचा आढावा घेतला. शालेय वार्षिक पत्रिका ‘प्रतिबिंब’चे ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर हार्दिक तोमर व रौशन रंजन यांचा पुष्पा व उदय लवासा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अध्यक्षांच्या हस्ते संतोष भद्री यांना महिन्यातील सर्वोत्तम कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्ची यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व प्रत्येकामध्ये काही विशि÷ प्रतिभा लपलेली असते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचा शोध घेऊन त्यांचा विकास करून जीवनात यशस्वी व्हावे. जीवनात यश गाठायचे असेल तर शिस्त आवश्यक आहे असे सांगितले.









