आपला हक्काचा माणूस आला : ग्रामस्थांनी व्यक्त केली भावना
मालवण | प्रतिनिधी : मुसळधार कोसळणाऱ्या पावसातही मालवण -कुडाळ भाजपा विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी बुधवारी मालवण तालुक्याचा दौरा सुरू ठेवत मोदी @ 9 अभियान अंतर्गत संपर्क अभियान माध्यमातून भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांच्या भेट घेत संवाद साधला. गेले काही दिवस संपर्क अभियान माध्यमातून निलेश राणे विधानसभा मतदारसंघात सातत्याने विविध भागात भेट देत आहेत. आपले हक्काचे माणूस घरी आले या भावनेतून ग्रामस्थांच्या माध्यमातून ही निलेश राणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करत आपुलकीने संवाद साधण्यात आला. सरकारच्या माध्यमातून झालेल्या व होत असलेल्या विकासकामांबाबत आभार व्यक्त करत नव्याने विकासकामांबाबत निलेश राणे यांच्याकडे हक्काने मागणी करण्यात आली. निलेश राणे यांच्याबाबत जनतेत असलेली आपुलकी व विकासकामे यांच्याच माध्यमातून होणार, हा विश्वास सर्वच ठिकाणी ग्रामस्थांच्या चर्चा, संवादातून दिसून आला. काही ठिकाणी गाडीचा मार्ग नाही अश्या ठिकाणी वाहणाऱ्या पाण्यातून चालत जात, काही ठिकाणी डोंगर माथ्यावर राहणाऱ्या शक्ती केंद्र प्रमुख यांच्या घरी जात निलेश राणे यांनी संवाद साधत आढावा घेतला.









