बांदा : प्रतिनिधी
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर आयोजीत आषाढ महोत्सव 2023 निमित्त ‘भरत भेट’ हा महान पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवारी दिनांक 14 जुलै रोजी रात्री ठीक 8 वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. यात गणपती- प्रतीक कलिंगण, दशरथराजा-उदय राणे, कली-दादा राणे, वशिष्ठ मुनी-प्रथमेश खवणेकर, इंद्र-गौरव शिर्के, नारद-चारु मांजरेकर, कैकयी-बंटी कांबळी, मंथरा-शिवा मेस्त्री, राम-सिद्धेश कलिंगण, लक्ष्मण-आबा कलिंगण, सिता-गौतम केरकर, भरत-सागर गावकर, सुमंत प्रधान-पिंटो दळवी, नावाडी-कृष्णा घाटकर व संगीत साथ म्हणून हार्मोनियम आशिष तवटे, मृदुनगमणी-पीयूष खंदारे, झंज- विनायक सावंत या कलाकारांचा सहभाग आहे. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.