कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षण सुरू असताना हा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यावर माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहा VIDEO>>> गोकुळ अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? अध्यक्ष काय म्हणाले पहा
‘तरूण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलताना विश्वास नारायण पाटील यांनी विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले. “गोकुळचे लेखापरीक्षणाचा अट्टाहास हा विरोधकांकडून राजकीय हेतून केलं जात असून यामध्ये कोणतंही तथ्य नाही. विरोधक माझ्या राजीनाम्या बाबतीत अफवा आणि उलटसुलट चर्चा पसरवत आहेत.”असे त्यांनी बोलून त्यांनी विरोधकांचा दावा खोडून काढला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या अध्यक्षपदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आपण जिल्हा उत्पादक दूध संघाची 2550 कोटी वरून 3420 कोटी रुपयांवर उलाढाल झाली असून 870 कोटी रुपयांची वाढीव उलाढाल झाली आहे. तसंच दोन वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांना दूध खरेदीसाठी सात वेळा दूध खरेदी दरात वाढदेखील केली आहे. गोकुळ दुधसंघात जवळपास 20 नवीन बाबी केल्याचा आपल्याला आनंद असून गोकुळचे चाचणी लेखापरीक्षणात कोणतेही तथ्य नाही. ह् लेखापरिक्षण विरोधकांकडून केवळ राजकीय द्वेषापोटी होत आहे.” असा आरोप त्यांनी केला.