वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्षपदी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या झाराप येथील कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीनंतर नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी मंडळाच्या जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी वेंगुर्लेतील शरद मेस्त्री यांच्याकडे देण्यात आली. या निवडीनंतर शरद मेस्त्री यांचे माळवते अध्यक्षांसह इतर सदस्य, महिला सदस्य तसेच वेंगुर्ले येथील त्यांच्या हितचितकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
तसेच शरद मेस्त्री हे भाजपा वेंगुर्ले चे सक्रिय कार्यकर्ते असुन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर यांनी अभिनंदन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









