
पणजी : आरोग्य मंत्री विश्वजित राणे चक्क कानडी भाषेतून कर्नाटकात भाषणाचा जोरदार प्रचार करीत आहे. या संदर्भातील त्यांच्या भाषणाची व्हिडीयो क्रीप सोशल मिडियावर प्रसारित झाली असून अख्खलित कानडीमधून त्यांचे जोरदार भाषण हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विश्वजित राणे यांची मातृभाषा मराठी आहे. त्यांची सर्वत्र भाषणे ही इंग्रजीतून होतात. सत्तरीतील खेडेगावात ते कोकणीतूनच भाषणे करतात. विश्वजित राणे यांच्या आई विजयादेवी प्रतापसिंह राणे या मूळ सांडूर (कर्नाटक) संस्थानिकांच्या राजकन्य. परंतु त्या मराठी व इंग्रजीतून बोलताना दिसतात सहसा कन्नडितून भाषण करीत नाहीत. विश्वजित राणे यांना कन्नड येते असे कोणालाच कधी वाटले नाही. परंतु आता त्यांच्याकडे भाजपाने कर्नाटकातील 6 मतदारसंघांची जबाबदारी दिल्यानंतर राणे यांनी आपली जोरदार फिल्डिंग तिथे लावलेली आहे. आणि चक्क कानडीतून ते तिथे भाषणे करीत आहेत गोव्यातील नेता चांगली कानडी बोलू शकतो हे कोणालाच माहित नव्हते. गोवा विद्यानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला झोपडपट्टीत राहणाऱ्या बिगर गोमंतकीय विशेषत: कानडी लोकांना समजावे यासाठी यरीयुरप्पा वा अन्य काही कन्नड मंत्र्यांना गोव्यात बोलाविले जायचे. मात्र विश्वजित राणे यांना कन्नड बोलता येते याचा थांगपत्ता कोणाला नव्हता. विश्वजित राणे हे आता कर्नाटकात जाऊन जोरदार कानडीतून भाषणे करीत आहेत हा तर गोव्यातील कानडी लोकांना तसेच कर्नाटकातील कानडी लोकांसाठी सुखद धक्का आहे. विश्वजितकडे हि कला देखील आहे याचा खुलासा आता तेथील प्रचारसभांमुळे झाला.









