सांगली प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र नाट्या विद्यामंदिर सा†मती, सांगली संस्थेतर्फे प्रतिवर्षी पाच नोव्हेंबर रंगभूमिदिनी आद्यनाटककार विष्णूदास भावे गौरवपदक पुरस्कार दिला जातो. यंदाचा 2023 चा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, गायक, नाट्यनिर्माते अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले रंगकर्मी प्रशांत दामले यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली 81 वर्ष नाट्याक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे पाच नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्याक्षेत्रात उलेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस ा†वष्णूदास भावे गौरवपदक देऊन सन्मा†नत करण्यात येते.
अखिल भारतीय मराठी नाट्या परिषद, मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले यांनी गेली चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट व मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तसेच ते गायक व नाट्यानिर्मातेही आहेत. त्यांना या कलाप्रवासात 20 हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यादर्पण पुरस्कार, कलारंजन पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार व अखिल भारतीय नाट्या परिषदेचे विविध पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बूक ऑफ रेकॉर्डस्चे विक्रम आहेत. त्यांनी नाटकाशिवाय 37 मराठी चित्रपट व 24 दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये आम्ही सारे खवय्ये ही लोकप्रिय ठरली आहे.
फेब्रुवारी 1983 पासून आजअखेर नाटकांचे 12500 हून अधिक प्रयोग केले आहेत. टूरटूर, पाहुणा, चल काहीतरीच काय, गेला माधव कुणीकडे, बे दुणे चार, शू: कुठे बोलायचे नाही, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, जादू तेरी नजर, कार्टी काळजात घुसली, साखर खाल्लेला माणूस, सारखं काहीतरी होतंय, लेकुरे उदंड झाली अशी त्यांची अनेक गाजलेली नाटके रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत.
जबाबदारी आणखीन वाढली..!
रंगभूमिची गेल्या अनेक वर्षांपासून जी सेवा करतोय, या सेवेचे मिळालेले फळ म्हणजेच स्व. विष्णूदास भावे गौरव पदक होय. आद्य नाटककार स्व. विष्णूदास भावे पदक यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार रंगभूमिवर काम करणाऱ्या कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे. हा मानाचा पुरस्कार मला मिळणे हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याचे असून, मी खूप आनंदी आहे. या पुरस्कारामुळे आता काम करण्याची माझी जबाबदारी वाढली आहे, असे मी समजतो.
प्रशांत दामले ज्येष्ठ अभिनेते








