मुंबई
विष्णूप्रकाश आर पुंग्लीया यांच्या समभागाने शेअरबाजारात मंगळवारी दमदार प्रवेश मिळवला आहे. कंपनीचा समभाग नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 67 टक्के प्रिमीयमसह 165 रुपयांवर खुला झाला होता. तर बीएसईवर समभाग 163 रुपयांवर लिस्ट झाला होता. बांधकाम क्षेत्रात असणाऱ्या कंपनीच्या समभागाची इशु किंमत 99 रुपये होती. पण सुरुवातीला एनएसईवर समभाग खुला होताच काही वेळात 11 टक्के घसरलाही होता.