तमिळ अभिनेत्याने केला साखरपुडा
तमिळ अभिनेता विशालने अभिनेत्री साई धनशिकासोबत साखरपुडा केला आहे. याची माहिती विशालनेच सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. तसेच त्याने साखरपुड्याची छायाचित्रे शेअर केली आहेत. या ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व प्रियजनांचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो. साई धनशिकासोबत झालेल्या साखरपुड्याची खूशखबर सर्वांसोबत शेअर करताना मला आनंद होतोय. नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची कामना करतो, असे विशालने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
विशाल आणि साई धनशिया हे मागील 15 वर्षांपासून परस्परांना ओळखत असून दोघेही चांगले मित्र आहेत. विशाल सध्या 48 तर धनशिका ही 35 वर्षांची आहे. विशाल अन् धनशिका यांच्या वयात 12 वर्षांपेक्षा अधिक अंतर आहे. विशाल हा तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे पूर्ण नाव विशाल कृष्ण रे•ाr आहे. तर साई ही तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आहे. तिने रजनीकांत यांच्या कबाली या चित्रपटातील अभिनयाद्वारे लोकप्रियता मिळविली होती. या चित्रपटात तिने रजनीकांत यांच्या मुलाची भूमिका साकारली होती.









