चौके । प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील चौके कुळकरवाडी येथील रहिवासी विशाल लक्ष्मण गावडे (45) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. विशाल गावडे हे कुळकरवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष होते. चौके बाजारपेठेत त्यांचा पानस्टॉल व्यवसाय होता. ते आदर्श व्यापारी संघ चौकेचे सदस्य होते. त्याचबरोबर उत्कृष्ट पखवाज वादक म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला होता .त्यांच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी ,आजी, एक मुलगा मुलगी, भाऊ वहिनी, बहीण काका असा परिवार आहे. चौके गावात सामाजिक ,धार्मिक कामामध्ये त्याचा नेहमी सहभाग असायचा. मनमिळावू स्वभाव व सर्वाना एकत्र घेऊन काम करण्याचा नेहमी त्याचा प्रयत्न असायचा. चौके पंचक्रोशीमध्ये त्याचा मोठा मित्र परिवार असून त्यांच्या अकाली जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.









