आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
पणजी : चीन देशात सध्या गतीने प्रसारित होत असलेल्या नवीन विषाणूपासून धोका नसून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. यासंदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्य महासंचालकांतर्फे चीन विषाणू फैलावाविऊद्ध उपाययोजनांच्या तयारीचा आढावा घेतला जात असून, जनतेच्या कल्याणासाठी आरोग्य क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सरकार सज्ज आहे, असे राणे यांनी नमूद केले आहे.









