मुंबई
जर्मनीतील कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगनने नुकत्याच नव्याने लाँच केलेल्या ‘विर्टस’ मोटारीला चांगला प्रतिसाद ग्राहकांकडून मिळतो आहे. केवळ 2 आठवडय़ात 2 हजार विर्टस कारचा पुरवठा करण्यात कंपनीला यश आले आहे. 9 जूनला ही गाडी लाँच करण्यात आली असून 11.21 लाख रुपये सुरुवातीची किंमत ठेवण्यात आली आहे. यात एकाच दिवशी ग्राहकांच्या मागणीनुसार कोचीत (केरळ) 150 विर्टस कारचा पुरवठा करण्यात आला असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.









