प्रतिनिधी /पणजी
गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि वनविभागातर्फे दि. 11 रोजी मान्सून ट्रेकिंग मोहीमेचे विर्डी धबधबा येथे आयोजन करण्यात आले आहे. विर्डी धबधबा हा पणजीपासून सुमारे दीड तासांच्या अंतरावर असून तिळारी वनक्षेत्रात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर स्थित आहे. हा मार्ग एक आव्हान म्हणून पाहिले जाते. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी सरासरी दोन तास 22 मिनिटे लागतात. पक्षी, हायकिंग आणि चालण्यासाठी हा एक लोकप्रिय मार्ग मानला जातो.
ट्रेकिंग मोहीम सर्वांसाठी खुली असून साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी उत्साही ठरणार आहे. म्हापसा येथून सकाळी 7 वा. आणि पर्यटन भवन पणजी येथून सकाळी 7.30 वा. त्यानंतर जुने गोवा, बाणास्तरी, सांखळी येथे 7.45 वा. तसेच मडगाव येथे सकाळी 6.46 वा. पिकअपची व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणी शुल्क रू.1200, जेवणासहित. ट्रकर्सनी सोबत कपडे, रेनवेअर, ट्रेकिंग शूज, स्नॅक्स आणि दुर्बीण सोबत घ्यावी. धूम्रपान आणि दारू पिण्यास सक्त मनाई आहे.
बुकिंगसाठी अनिल दलाल, जीटीडीसी : 9422057704/ 8379022215 संपर्क करावा. ऑनलाईन बुकिंगसाठी कृपया goa-tourism.com भेट द्या.









