रूट प्रीमियर लीग पीजे चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धेत लावण्या संघ उपविजेता
बेळगाव : कुडची व करडीगुद्दी येथील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी रूट प्रीमियर लीग पीजे चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट इलेव्हन करडीगुद्दीने लावण्या स्पोर्ट्स-सांबराचा पराभव करुन पीजे चषक पटकाविला. सदर स्पर्धेसाठी 120 खेळाडूंची निवड करुन त्यामध्ये 6 संघांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेत पीजीएस स्पोर्ट्स बीएलके, एस.जी.स्पोर्ट्स बीएलके, विराट इलेव्हन- केडीडी, सहारा स्पोर्ट्स-एमडीजी, टायटन्स मोदगा, लावण्या स्पोर्ट्स सांबरा या संघाचा समावेश आहे. अंतिम सामन्यात विराट इलेव्हन-करडीगुद्दीने प्रथम फलंदाजी करताना 12 षटकात 4 गडी बाद 92 धावा केल्या. त्यात साकीबने 12 षटकार व 1 चौकारासह 17 चेंडूत 79 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना लावण्या स्पोर्ट्स सांबराने 12 षटकात 7 गडी बाद 81 धावा केल्या. त्यात मनोजने 14 चेंडूत 54 धावा केल्या. प्रथमच पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. एअरफोर्सच्या बाळेकुंद्रीच्या मैदानावरती खेळविण्यात आला. सामन्यानंतर ओमकार प्रशांत जाधव, राजदीप जाधव, अमिन मुल्ला व जया यांच्या हस्ते विजेत्या विराट इलेव्हन संघाला व उपविजेत्या लावण्या संघाला चषक देवून गौरविण्यात आले.









