वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मंगळवारी जाहीर केले की, त्याला आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांना 15 फेब्रुवारीला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. कोहली आणि अनुष्का यांना वामिका ही तीन वर्षांची मुलगी आहे.
‘मोठ्या आनंदाने आणि आमच्या प्रेमाने भरलेल्या अंत:करणासह, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा लहान पुत्र अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले आहे’, असे कोहलीने एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
आम्ही आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, यावेळी आमच्या खासगी जीवनाचा आदर करावा, असे कोहलीने त्यात म्हटले आहे. कोहलीने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविऊद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून अंग काढून घेतले होते.









