वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या राजस्थान रॉयल संघाविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बेंगळूर संघाला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा हंगामी कर्णधार विराट कोहलीला दंड ठोठावण्यात आला आहे. बेंगळूर संघाकडून अशा प्रकारचा दुसरा गुन्हा आहे.
आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक संघाला दिलेल्या कालावधीत षटके पूर्ण करावी लागतात. पण या कालावधीमध्ये षटके बाकी राहिली तर तो गुन्हा समजला जातो. बेंगळूर संघाकडून आतापर्यंत दोनवेळा असे गुन्हे नोंदवले गेले आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हंगामी कर्णधार विराट कोहलीला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर या संघातील अंतिम 11 खेळाडूमधील प्रत्येक खेळाडूला तसेच इम्पॅक्ट बदली खेळाडूलाही मिळणाऱ्या मानधन रकमेतील 25 टक्के रक्कम म्हणजेच सुमारे 6 लाख रुपये दंड म्हणून केला जात आहे.









