वृत्तसंस्था/ बेंगळूर
31 मार्चपासून 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे पुन्हा सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विराटचे शनिवारी येथे आगमन झाले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघातर्फे ‘अनबॉक्स’ हा समारंभ आयोजित केला आहे. या समारंभात विराट कोहलीसह ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, डू प्लेसीस, मॅक्सवेल, रजत पाटीदार व अन्य क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये कोहली, डिविलियर्स, गेल आणि डू प्लेसीस यांचा समावेश करण्यात आला आहे. डिविलियर्सने 2011 ते 2021 या कालावधीत 157 सामने आयपीएल स्पर्धेत आरसीबीतर्फे खेळताना 4 हजार 522 धावा जमविल्या आहेत. 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.









