नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या सुपर-4 सामन्यात नाबाद 122 धावांची शतकी खेळी साकारत शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणणाऱया विराट कोहलीचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी कौतुक केले. विराट खेळाडू या नात्याने माझ्यापेक्षा अधिक कुशल खेळाडू आहे, असे ते म्हणाले. विराट व गांगुली या उभयतांनीही कर्णधार या नात्याने आक्रमक खेळावर भर दिला. मात्र, विराट आपल्यापेक्षा कुशल खेळाडू असल्याचे गांगुली यांनी येथे म्हटले आहे.









