आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराटला श्रीलंकेच्या एका चाहत्याने चक्क चांदीची बॅट गिफ्ट म्हणून दिली. श्रीलंकन फॅन्सचे सोन्यासारखे हृदय पाहून विराट देखील भावूक झाल्याचे दिसून आले. विराटचा हा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली चाहत्यांशी गप्पा मारताना दिसत आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी मैदानावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगलाच घाम गाळला. यावेळी कोलंबोमधील काही चाहत्यांनी सरावादरम्यान हजेरी लावताना विराटची भेट घेतली. विराटने देखील मोठे मन दाखवत चाहत्यांना वेळ दिला. त्यानंतर त्याने प्लेयर म्हणून कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, यावर चर्चा गेली. त्यानंतर चाहत्यांनी विराटला सरप्राईज दिलं. एका चाहत्याने विराटला थेट चांदीची बॅट दिली.









