औक्षण करून मतदार भगिनींनी दिला विजयी कौल : शहराच्या मध्यवर्ती भागातून भरघोस पाठिंबा
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ शहराच्या मध्यवर्ती भागात करण्यात आला. श्री कपिलेश्वर मंदिर येथे समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी कपिलनाथाचे विधिवत पूजन करून प्रचाराला सुरुवात केली. य् ाावेळी प्रचारफेरी पुढे मार्गक्रमण करत कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली, रामामेस्त्री अ•ा, महाद्वार रोड, संभाजी गल्ली पहिला क्रॉस, मराठा गल्ली निम्मा भाग, तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, कांगले गल्ली, पाटील गल्ली, पाटील मळा आणि शनिमंदिर परिसर येथे प्रचारफेरी समाप्त करण्यात आली. य् ाावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित राहून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे. य् ाावेळी युवानेते शुभम शेळके, कपिल भोसले, प्रकाश चौगुले, सुनील बाळेकुंद्री, बंडू भातकांडे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, अनंत चौगुले, रेणू मुतकेकर, महेश मुतकेकर, प्रकाश शिरोळकर, प्रवीण तेजम, प्रसाद मरगाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
गल्लोगल्ली भव्य स्वागत
बेळगाव शहरात गेल्या 24 वर्षांत समितीचे आमदार होऊ शकले नाहीत. पण यावेळी समितीचा आमदार निवडून येवू शकतो, अशी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर मतदारसंघातील मराठी जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी बेळगाव शहराला समितीचा आमदार मिळून पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी सज्ज असल्याच्या निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी गल्लोगल्ली अमर येळ्ळूरकर यांचे औक्षण करून माता-भगिनींनी स्वागत केले. समितीचा आमदार निवडून यावा, असा निर्धार सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.









