कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणाहून सर्व राजकीय [पोस्टर्स, बॅनर्स, भिंतीवरील मजकूर हटविण्यासाठी निवडणुक कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यरत होण्याची सूचना बेळगाव जिल्हा निवडणुक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
मतदानकेंद्रांना मूलभूतसुविधा पुरविण्यात आले पाहिजे. याची खात्री सेक्टर अधिकाऱ्यांनी करून घ्यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई झाली पाहिजे. अवैध पैसे, दारू, व इतर भेटवस्तू तस्करीवर आणि या आधी तस्करीत आढळल्या व्यक्तींवर करडी नजर ठेवावी. विनापरवाना प्रचार करण्यासाठी अनुमती नाही. अनधिकृत सभा-बैठक बोलाविण्यास मनाई केली आहे. अशा अनेक सूचना त्यांनी केल्या आहेत. .
बैठकीत जिल्हा पोलीस वरिष्ठ डॉ . संजीव पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर व इतर अधिकारी उपस्थित होते.
Previous ArticleKarnataka Election कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजले; 13 मे रोजी निवडणूकीचा धुरळा
Next Article नेमळेत बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त !