सातारा :
सातारा शहरात विसर्जन मिरवणुकीत आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी आठ गुन्हे दाखल झाले असून त्याचा तपास पोलीस करत आहेत. विसर्जन मिरवणूक सुरु असताना दि.5 रोजी रात्री 9.30 वाजता राजवाडा येथील गोलबागेजवळ मोरे कॉलनी येथील शिवनगर उत्सव मंडळाच्या समोर साई लाईट्स कोरेगाव याने बिम लाईट लावली. त्यावरुन त्याच्याविरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात आदेशाचा उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोवेकर, हवालदार पाटोळे, कदम, साळुंखे, पो. कॉ. गवळी हेही बंदोबस्ताला होते.
कमानी हौद येथे दि. 6 रोजी रात्री 8 वाजता मिरवणूक आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बालदत्त गणेश मंडळाच्या समोर एस लाईट्सचा मालक रितेश चंद्रकांत खरात (रा. शिरवळ) याने बिम लाईट लावून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याचा तपास हवालदार मेचकर हे करत आहेत.
विसर्जन मिरवणुकीत राजपथ येथे राजलक्ष्मी टॉकीजसमोर बालदत्त गणेश मंडळ गुरुवार पेठ या मंडळाच्या समोर दि. 6 रोजी रात्री 8.30 वाजता एस लाईट्सचा मालक वरद अनिल देशमुख (रा. मंगळवार पेठ) याने आदेशाचा भंग करुन बिम लाईट लावली. त्यावरुन त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लोणारगल्ली रविवार पेठ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गणेशोत्सव मंडळाच्या समोर श्री गणेशाय लाईट्सचा मालक अमित अर्जुन कदम रा. आरळे याने दि. 6 रोजी सायंकाळी 7.45 वाजता बिम लाईट लावून आदेशाच भंग केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजलक्ष्मी टॉकीजसमोर करंज्याचा राजा गणेशोत्सव मंडळासमोर अजिंक्य लाईटचा मालक याने 5 रोजी रात्री 8.30 वाजता बिम लाईट लावून आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तसेच बाटा शोरुम रविवार पेठ येथे पोलीस मुख्यालय या रोडवर 6 रोजी दुपारी 4 वाजता येण्या जाण्यास अटकाव करणाऱ्या ट्रॅक्टर क्र. एमएच 11 बीए 9964 चा चालक सागर कांबळे याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रविवार पेठेतील श्री गणेशोत्सव मंडळाच्या समोर 5 रोजी सायंकाळी 7.45 वाजता रिच लाईट लावल्याप्रकरणी राहुल बाळकृष्ण बनसोडे (रा. रविवार पेठ) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सातारा तालीम संघाच्या समोर 5 रोजी सायंकाळी 6.45 वाजता एकता गणेश मंडळ करंजे पेठचा राजा यांच्यासमोर यश रविंद्र भोसले (रा. एकसळ) याने बिम लाईट लावल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..








