विनापरवाना बांधकाम थांबवले नाही; पोलिसांत कारवाई
उचगाव : वळीवडे त. करवीर येथील सि.स.क्र. १८३/१५ अ पैकी प्लॉट नंबर ४ या भूखंडावर रमेश ईश्वरलाल कारडा, सतीश ईश्वरलाल कारडा, मुकेश ईश्वरलाल कारडा, महेश ईश्वरलाल कारडा, सर्व (रा. वळीवडे, ता करवीर) यांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नियमांचा भंग करून विनापरवाना बांधकाम केल्याबद्दल तसेच वारंवार नोटीस देऊनही बांधकाम थांबवले नाही म्हणून गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अंशुमन संजय गायकवाड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार कारडा यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतचा तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.









