माजी आमदार राजन तेलींनी दिल्या शुभेच्छा !
सावंतवाडी : प्रतिनिधी
राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा भाजप नेते विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री पदी नियुक्ती झाली आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले श्री . तावडे यांची आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे. त्यांना मोठे पद देऊन त्यांचा सन्मान केला आहे . नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









