आपल्याला राज्याच्या राजकारणात रस नसून केंद्रातील राजकराणाचा आनंद वेगळा आहे. तसेच भाजपमध्ये (BJP) कोणत्याही प्रकारची गटबाजी नसून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) यांच्या टिमच्या नेतृत्वाखालीच भाजप काम करेल असा खुलासा भाजपचे नवनियुक्त सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde ) यांनी खुलासा केला. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
आपल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, “मला राज्याच्या राजकारणात काही रस नाही. केंद्रीय राजकारणात केंद्रिय राजकारणात व्यापक व्यापक तयार होतो. केंद्रात काम करण्याचा वेगळा आनंद असल्याने राज्यात पुन्हा येण्याचा आनंद नाही. त्यामुळे आता फक्त राष्ट्र…नो महाराष्ट्र” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्राच भाजप नेर्तृत्वबदल करणार असल्याच्या बोतम्यामध्ये अजिबात तथ्य नाही. भाजप ही देवेंद्र फडणवीस यांच्या टीमच्या नेतृत्वाखालीच काम करणार असून मला केंद्रातच काम करायचं आहे. भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नाही. भारतीय जनता पार्टी ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नर्तृत्वाखाली काम करत असल्याने अशा शक्यता कमी नाहीत.”
भाजपचे 2024च्या निवडणुकीचे ध्येय काय असेल या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “भाजपने पक्षाची नविन योजना राबवली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी राजकिय स्ट्रेटेजी तयार असून लोकसभा प्रवास योजना आम्ही राबवत आहोत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे आव्हान भाजप नक्कीच कापून टाकेल. भाजपची हिंदूत्वाच्या मतांची टक्केवारी शिवसेनेमुळे वाढून तसेच मोदीजी की राहूलजी अशी लढाई होईल त्याचाही भाजपला फायदा होईल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.