चिलीच्या पदरी पुन्हा निराशा
वृत्तसंस्था/ साओ पावलो
व्हिनिसियस ज्युनियरच्या एका गोलमुळे ब्राझीलने 2026 च्या विश्वचषकात स्थान मिळवले असून कार्लो अँसेलोटी यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर घरच्या मैदानावर पदार्पणातच महत्त्वाचे यश मिळविले आहे. रिअल माद्रिदमध्ये एकेकाळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या या जोडीने ब्राझीलला साओ पावलो येथे पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून दिला.
दुसरीकडे, इक्वेडोरने पेरूविऊद्ध 0-0 अशी बरोबरी साधून पुढील वर्षीच्या जागतिक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. कोलंबियाशी 1-1 अशी बरोबरी साधलेला गतविजेताअर्जेंटिना आधीच पात्र ठरला होता आणि दक्षिण अमेरिकन पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवण्याची त्याला खात्री आहे. इक्वेडोर व ब्राझीलचे प्रत्येकी 25 गुण झाले आहेत, परंतु विजयांच्या आधारे इक्वेडोर दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही देश अर्जेंटिनापेक्षा 10 गुणांनी मागे आहेत. परंतु महत्त्वाचे म्हणजे पात्रता मोहिमेत दोन सामने शिल्लक असताना सातव्या स्थानावर असलेल्या संघाहून सहा गुणांपेक्षा जास्त फरकाने पुढे आहेत. दक्षिण अमेरिकेतील अव्वल सहा संघ 48 संघांच्या विश्वचषकात थेट प्रवेश मिळवतील..
बोलिव्हियाविऊद्ध 2-0 असा पराभव पत्करल्याने चिलीला सलग तिसऱ्या विश्वचषकाला मुकावे लागेल आहे आणि त्यांना 10 राष्ट्रांच्या राउंड-रॉबिन स्पर्धेत शेवटचे स्थान मिळवावे लागेल, ज्यामुळे मुख्य प्रशिक्षक रिकार्डो गॅरेका यांना त्यांचे पद गमवावे लागले आहे. उऊग्वेने घरच्या मैदानावर व्हेनेझुएलाचा 2-0 असा पराभव केला. रॉड्रिगो अगुइरे आणि जॉर्जियन डी अरास्केता यांच्या गोलाच्या जोरावर त्यांनी हा विजय मिळविला. 24 गुणांसह ते विश्वचषकात थेट प्राप्त होणाऱ्या स्थानांपैकी एकाच्या जवळ पोहोचले आहेत. 18 गुणांसह व्हेनेझुएला सातव्या स्थानाच्या स्पर्धेत बोलिव्हियापेक्षा एक गुण पुढे आहे. सातवे स्थान प्राप्त झाल्यास आंतरखंडीय प्लेऑफमध्ये स्थान मिळते.
ब्युनोस आयर्समध्ये अर्जेंटिनाचा कोलंबियाविऊद्धचा सामना लिओनेल मेस्सीसाठी फारसा उल्लेखनीय ठरला नाही. लुईस डियाझने 24 व्या मिनिटाला पाहुण्यांसाठी गोल केला. 70 व्या मिनिटाला एन्झो फर्नांडिसला मैदानाबाहेर पाठवण्यात आले, ज्यामुळे स्टेडियमवर उपस्थित 80,000 हून अधिक चाहत्यांची निराशा झाली. परंतु ज्युलियन अल्वारेझने 81 व्या मिनिटाला बरोबरीचा गोल करण्यात यश प्राप्त केले.
गुऊवारच्या इक्वेडोरविऊद्धच्या 0-0 अशा बरोबरीनंतर अँसेलोटी यांना चाहत्यांच्या निराशेला तोंड द्यावे लागले होते. कारण त्यांच्या संघाने संपूर्ण सामन्यात बचाव करण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. मंगळवारी 66 वर्षांचे झालेल्या सदर इटालियन प्रशिक्षकाने निओ क्विमिका अरेना येथे मात्र त्यांच्या संघाला अधिक आक्रमक बनवण्याच्या दृष्टीने बदल करण्याचे आश्वासन दिले होते. तेथे त्यांचे स्वागत 46,000 चाहत्यांनी केले. या सामन्यात गॅब्रिएल मार्टिनेलीने मिडफिल्डर गर्सनची जागा घेतली आणि तो सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहिला. निलंबनानंतर परतलेल्या राफिंहानेही पॅराग्वेच्या बचावापुढे अनेक समस्या निर्माण केल्या.
व्हिनिसियस ज्युनियरकडे अनेकदा लक्षवेधी खेळाडू म्हणून पाहिले जाते आणि त्याने मॅथियस कुन्हासोबत आघाडीफळी सांभाळली. पॅराग्वेच्या बचावफळीची चूक, कुन्हाचा क्रॉस आणि ब्राझीलच्या 10 क्रमांकाची जर्सी घालणाऱ्या खेळाडूचा सौम्य स्पर्श यामुळे सामन्यातील सदर एकमेव गोल झाला. ‘हे तुमच्यासाठी आहे’, असे व्हिनिसियस ज्युनियरने आनंदोत्सव साजरा करताना प्रशिक्षकाला सांगितले. गोलसंख्या कमी राहिली असली, तरी यजमान संघ या विश्वचषक पात्रता मोहिमेतील बहुतेक सामन्यांपेक्षा खूपच जास्त आक्रमक राहिला.
दक्षिण अमेरिकन पात्रता स्पर्धा सप्टेंबरमध्ये संपेल. उऊग्वे आणि पॅराग्वेला त्यांचे थेट स्थान निश्चित करण्यासाठी प्रत्येकी एक गुण आवश्यक आहे. उऊग्वे पेरू आणि चिलाचा सामना करेल, तर पॅराग्वेचा सामना इक्वेडोर आणि पेरूशी होईल. 22 गुणांसह सहाव्या स्थानावर असलेला कोलंबिया बोलिव्हिया आणि व्हेनेझुएलाविऊद्ध खेळेल. व्हेनेझुएलाचे आगामी प्रतिस्पर्धी अर्जेंटिना आणि कोलंबिया असतील.









