हेस्कॉमने त्वरित हटविण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : कडोलकर गल्ली येथील विद्युतवाहिन्यांवर वेलींचे जाळे पसरले आहे. यामुळे विजेच्या वाहिन्या एकत्र येऊन मोठा धोका संभवू शकतो. त्यामुळे वीजवाहिन्यांवरील या वेली हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम सुरू असताना नागरिकांच्या जीवाचा देखील विचार करावा, अशी मागणी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी वेलींचे वीजवाहिन्या तसेच ट्रान्स्फॉर्मरवर जाळे पसरले आहे. बऱ्याच वेळा शॉर्टसर्किटमुळे धोका संभवू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वर्षभर या वेली तोडल्या जात असतात. परंतु, कडोलकर गल्ली येथे अॅक्सेस बँकेसमोर वीजवाहिन्यांवर वेलींचे जाळे पसरले आहे. त्यामुळे मोठा धोका होण्यापूर्वीच वेली हटवण्याची मागणी केली जात आहे.









