सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये कलेश्वर मंदिर येथे खा. विनायक राऊत यांनी भेट घेत दर्शन घेतले.यावेळी शिवसेना नेते पदी निवड झाल्या नंतर प्रथमच ते सावंतवाडी दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी तथा वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रुपेश राऊळ, रमेश गावकर, सुनील गावडे, शरद जाधव, बाळु गावडे, संतोष गावडे, मानकरी उपस्थित होते.









