Vinayak Mete Death: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज सकाळी पहाटे अपघाती निधन झाले. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांनी शोक व्यक्त केला. मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपला, अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. विनायक मेटे यांना एमजेएम रुग्णालयात नेताच अनेक नेत्यांनी रूग्णालयाला भेट दिली आहे. मराठा समाजासाठी मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
मोठा सामाजिक नेता हरपला-शरद पवार
शरद पवार म्हणाले, आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय धक्कादाय़क होती. मोठा सामाजिक नेता हरपला. सामाजिक प्रश्नांसाठी मेटे कायम लढले. समाजकारण हे त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं.समाजासाठी लढणारा नेता हरपला. गेले २० ते २५ वर्ष त्यांनी जमनत तयार करण्याची मोठी भूमिका पार पाडली.
घटनेबाबत संपूर्ण चौकशी होईल-एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजासाठी न्याय मिळावा यासाठी तळमळीने ते लढले. शासन त्यांच्या परिवारासोबत आहे. चार दिवसापूर्वीच त्यांची आणि माझी भेट झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेबाबत संपूर्ण चौकशी होईल असेही ते म्हणाले.
समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला नेता-उदयनराजे
उदयनराजे म्हणाले, समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला नेता हरपला. मेटेंच्य़ा जाण्यानं मराठा समाजीची हानी झाली आहे. महामार्गावर २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असते. माझी शासनाला विनंती आहे की वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चाप बसणं गरजेचं आहे.
मेटेंना खरी श्रध्दांजली कशी देऊ शकतो?…संभाजीराजे
यावेळी संभाजीराजे म्हणाले, मराठ्यांची शान असणारे व्यक्तीमत्व आज आपल्यातून निघून गेले आहे.त्यांचं जाणं हा मोठा धक्का आहे. दुर्बलांसाठी झटणारा नेता हरपला. समाजाला दिशा देण्यासाठी मेटे सतत लढले. मेटेंना खरी श्रध्दांजली कशी देऊ शकतो. याबाबत सरकारने लक्ष घालण गरजेचं आहे. यावेळी त्यांनी मेटेंसोबत असणाऱ्या आठवणी सांगितल्या.
राजकारणाची कधीही न भरून निघणारी हानी झाली – देवेंद्र फडणवीस
सामान्यांसाठी लढणारा नेता हरपला. राजकारणाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या आम्ही पाठिशी उभे आहोत. विनायक मेटेंचा मराठा समाजा संदर्भात प्रचंड अभ्यास होता. काल रात्री सव्वा दोन वाजता मेसेज केला होता. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Previous Articleमालवणात तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article रांगोळीतून अशाही शुभेच्छा !








