Ajit Pawar : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघात होण्यामागे त्यांच्या कारचालकाची डुलकी कारणीभूत ठरली असण्याची शक्यता विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्तवली आहे. अजित पवार यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी ते म्हणाले, गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा सोडला नाही. विनायक मेटेंनी मराठा समाजासाठी शिवसंग्राम संघटना स्थापन केली. ते पूर्वी आमच्यासोबत राष्ट्रवादीतही होते. आम्ही एकोप्यानं चर्चा करायचो. आम्ही महाराष्ट्राच्या अनेक दौऱ्यांमध्ये सोबत होतो. एक चांगला सहकारी आम्ही सगळ्यांनी गमावला आहे.अनेक वर्ष माझे त्यांच्याशी जवळचे संबंध होते. चार दिवसांपूर्वी सकाळी ८ वाजता त्यांनी देवगिरी बंगल्यावर माझी भेट घेतली. मला १५ सप्टेंबरला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचं निमंत्रणही दिलं होतं. असेही ते म्हणाले.
विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, प्रवासात रात्रभर चालक जागा होता. त्यात चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यातून हा अपघात झाला असेल. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून अजून चित्र स्पष्ट होईल. कारण हे सगळं कंटेनरच्या संदर्भातलं आहे. कंटेनरचा वेग आणि कारचा वेग किती असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असं देखील अजित पवारांनी नमूद केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









